dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

परभणीत हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला, सहा जणांचा मृत्यू

परभणी :  मानवत तालुक्यातील प्रसिद्ध यशवाडी देवस्थान येथे शनिवार, 20 जून रोजी गर्दीत एक भीषण दुर्घटना घडली आहे. मंदिरासमोरील सभागृहाचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, ८ ते १० भाविक गंभीर जखमी झाले आहेत. तर ३० ते ४० भाविक सभामंडपाच्या ढिगाऱ्याखाली दबल्याचे वृत्त आहे. वृत्त देईपर्यंत सभामंडप कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मयतांची नावे समजली नसल्याची माहिती मानवत पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे यांनी दिली.

यशवाडी देवस्थान येथे दर शनिवारी जिल्हाभरातून आणि शेजारच्या भागांतून हजारो भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात. आज शनिवारी देखील सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मुख्य मंदिरासमोरील सभागृहात दर्शन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन सुरू होते. शेकडो भाविक या सभागृहात उपस्थित असतानाच अचानक दुपारी सभागृहाचे छत कोसळले. छत कोसळल्याचा मोठा आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि भाविकांमध्ये पळापळ सुरू झाली. अचानक सभामंडपाचे छत अंगावर कोसळल्यामुळे 30 पेक्षा जास्त भाविकांना बाहेर पडता आले नाही आणि ते या ढिगाऱ्याखाली अडकले गेले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top