Shegaon Crime News: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल

Police raid Delight Cafe

Shegaon Crime News: लग्नाचे आमिष दाखवून 40 वर्षीय महिलेवर इसमाने शेगाव येथील एका लॉजवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

शेगाव : लग्नाचे आमिष दाखवून 40 वर्षीय महिलेवर इसमाने शेगाव येथील एका लॉजवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार,  ती जिल्ह्यातील संग्रामपुर तालुक्यातील एका खेड्यामध्ये तिच्या मुलासोबत राहते.  जामोद येथील सुरेश उखर्डा खेर्डेकर (38) याने लग्नाचे आमिष देत शेगाव येथील एका लॉजवर १ एप्रिल २०२४ चे दुपारी  अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला. तसेच तिचे फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मीडियावर वायरल करण्याची धमकी दिल्याचेही महिलेने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी  महिलेने 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी शेगाव शहर पोस्टे गाठून तक्रार दिली आहे. उपरोक्त आरोपीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आयरे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »