शेगांव : तालुक्यातील जलंब येथे जुन्या वादातून चार जणांनी मिळून एकाला बेदम मारहाण केल्याची घटना 14 जून रोजी घडली. या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान 18 जून रोजी मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेने संपूर्ण शेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. योगेश प्रल्हाद मोहे(32वर्ष) असे मृतकाचे नाव आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वासुदेव धोडुजी मोहे,गजानन धोडुजी मोहे, शालीग्राम धोडुजी मोहे, विशाल शालीग्राम मोहे (सर्व रा. जलंब) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणाची तक्रार मृतकाची पत्नी पल्लवी योगश मोहे यांनी दिली. त्यानुसार, जुन्या वादाच्या कारणावरून हा वाद उफाळला. गावातील संतोष काळे यांच्या घराजवळ एकत्र येवून वासुदेव मोहे,गजानन मोहे याने योगेश यांना पकडले व शालीग्राम आणि विशाल याने लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. यात, मृतक योगेश यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने त्यांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर, प्रकृती चिंताजनक असल्याने आधी अकोला व नंतर नागपूर येथे त्यांना हलविण्यात आले. अखेर, 18 जून रोजी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, गुरुवारी रात्रीच तिन्ही आरोपींना जलंब येथून अटक करण्यात आल्याची माहिती पोहेकॉ तडवी यांनी दैनिक महाभूमिशी बोलताना दिली.