शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शंकर गाडेकर यांची निवड

टेंभुर्णी :  नळविहीरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शंकर भिकाजी गाडेकर यांची तर उपाध्यक्षपदी अनिल काकासाहेब मोरे यांची बिनविरोध निवड सोमवार, 2 फेब्रुवारी रोजी करण्यात आली.

नळविहीरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यासाठी सोमवारी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत सर्वानुमते शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शंकर गाडेकर यांची तर उपाध्यक्षपदी अनिल मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या कार्यकारिणीमध्‍ये सरला गाडेकर, डिगांबर मोरे, संतोष मोरे, वंदना गाडेकर, परमेश्वर मोरे, कृष्णा जाधव, स्वाती दानवे, विलास गाडेकर, ज्योती गायकवाड, प्रतिभा जाधव, अरुण गाडेकर यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी सुनिल गायकवाड, विष्णू गाडेकर, अंबादास जाधव, बाबुराव क्षीरसागर, विष्णू लोखंडे, नंदू गाडेकर, पवन गाडेकर, आकाश वाकुडे, अंकुश गाडेकर, परमेश्वर मोरे, शिवाजी गाडेकर, शाळेचे मुख्याध्यापक शिवहरी नागरे, दत्तू मुनेमाणिक, सुनिल अंभोरे, काशिनाथ उखर्डे, विनोद कळंबे, दिपक चव्हाण, ज्ञानेश्वर झगरे, मंजुषा बकतकार, पूजा गहेरवाल आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »