लासूर स्टेशन : गंगापूर तालुक्यातील सनाव येथील शिवना नदीत अकीब अनिस शेख (१७ वर्ष) याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवार, 10 सप्टेंबर रोजी दुपारी घडली. तब्बल दोन तासांच्या शोधमोहिमेनंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व वाहून गेलेल्या मुलाचा शोध घेतला.

मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअग्निशमन केंद्र अधिकारी विजय राठोड, ड्यूटी अधिकारी एल. पी. कोल्हे, अग्निशमन जवान छत्रपती केकाण, गोरखनाथ जाधव, कमलेश सलामबाद, विशाल घरडे, गोपीचंद मोरे आदींनी शोधमोहिमेनंतर त्याला बाहेर काढले. या वेळी मृत मुलांच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. घटनास्थळी शिल्लेगावचे पोलिस निरीक्षक सलीम चाऊससह पोलिस कर्मचारी, मंडळ अधिकारी के. आर. घुगे व ग्राम महसूल अधिकारी सूरज जाधव ग्रामस्थ उपस्थित होते. अकीब अनिस शेख रा. सनाव, ता. गंगापूर असे मृत मुलाचे नाव आहे. तो बारावीचा विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. तो जनावरे चरवण्यासाठी गेले असता पोहायला गेला शिवना नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने व त्याला पोहताही येत नसल्यामुळे तो पाण्यात बुडाला होता. या प्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.