सोयगाव : मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावर होणाऱ्या उपोषणात सहभागी होण्यासाठी सोयगाव तालुक्यातील सात हजार मराठा सेवक बुधवार, 27 ऑगस्ट रोजी मुंबईला रवाना झाले असल्याची माहिती तालुका संयोजक विजय काळे यांनी दिली.

मराठा समााजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्ंयासाठी मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील हे गुरुवार, 28 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण करणार आहेत. या उपोषणाला समर्थन देण्यासाठी सोयगाव तालुक्यातील विविध गावातून तब्बल सात हजार मराठा सेवक बुधवारी मुंबईच्या दिशेने विविध वाहनांनी रवाना झाले आहेत. मराठा आरक्षण आंदोलन आणि गणेशोत्सव यामुळे सोयगाव शहरात बुधवारी वाहनांची गर्दी झाली होती. दुसऱ्या टप्यात गुरुवारी जवळपास तीन ते चार हजार मराठा सेवक मुंबईला रवाना झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आंदोलनात सहभागी होण्याचा निर्धार मराठा सेवकांनी केला असल्याचे तालुका संयोजक विजय काळे यांनी सांगितले.