Sensex falls 468.91 points: बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 468.91 अंकांनी घसरून 72,363.03 वर आला. NSE निफ्टी 149.2 अंकांनी घसरून 21,947.55 वर आला.
मुंबई : परदेशी निधीची सततची माघार आणि अमेरिकन बाजारातील कमजोर कल यामुळे मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात देशांतर्गत निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी घसरले. बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 468.91 अंकांनी घसरून 72,363.03 वर आला. NSE निफ्टी 149.2 अंकांनी घसरून 21,947.55 वर आला.
सेन्सेक्स लिस्टेड कंपन्यांमध्ये पॉवरग्रीड, मारुती, भारती एअरटेल, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि टायटन या कंपन्यांचे शेअर्सचे सर्वाधिक नुकसान झाले. बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक आणि टाटा मोटर्सचे शेअर्स वाढले.
जपानचा निक्की, तर चीनचा शांघाय कंपोझिट तोट्यात
आशियाई बाजारात जपानचा निक्की आणि चीनचा शांघाय कंपोझिट तोट्यात तर दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि हाँगकाँगचा हँग सेंग नफ्यात होता. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 3,309.76 कोटी रुपयांच्या समभागांची निव्वळ विक्री केली. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.01 टक्क्यांनी घसरून US $ 86.74 प्रति बॅरल झाले.