तूळजापूरला जाण्यास नकार ; शाळकरी मुलाची आत्महत्या

धावडा  :  मिञासोबत दुचाकीने तुळजापूरला जायचा हट्ट धरला, माञ पावसाचे वातावरण असल्याने आई वडीलाने जाण्यास नकार दिला. याचा राग आल्याने एका शाळकरी मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना भोकरदन तालुक्यातील लेहा येथे घडली. या प्रकरणी पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

 नैतीक सदाशीव सोनुने (१६) असे आहे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. नैतीक हा गावाला लागूनच असलेल्या सरस्वती शाळेत दहाव्या वर्गात शिक्षण घेत होता.पंरतु नवरात्र सुरू असल्याने मिञाने आपण दुचाकीने तुळजापूरला दर्शनासाठी जाऊ, अशी कल्पना आखली होती. नैतिकने याबाबत घरी तगादा लावून धरला होता. त्यामुळे नैतिक हा शनिवारी दुपारी शाळेतून घरी आल्यावर आपल्या आईकडे शेतात गेला व तुळजापूरला जाण्याविषयी विचारले. यावेळी आई शेतात भुईमुंगाच्या शेंगा तोडण्याचे काम करीत होती. आईने वातावरण खराब असल्याने बाळा सध्या जाऊ नको, वातावरण चांगले झाले की आपण सोबत जाऊ, असे सांगितले. नैतीकला राग आल्याने तो शेतातून घरी आला व दरवाजा आतून बंद करीत गळफास घेऊन आपली जिवनयाञा संपवली. त्याचे आजोबा गावातील एका अंत्यवीधीसाठी गेले होते. त्यांनी घरी आल्यावर घराचा दरवाजा बंद असल्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता, त्यांच्यासमोर हे दृश्य दिसले. नातेवाईकांनी नैतिकला रूग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. घरातील एकुलता एक तरुण मृत पावल्याने गावात  हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »