Santosh Deshmukh murder case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथिल सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय विश्वासू म्हणुन परिचित असलेला बीड जिल्ह्यातील खंडणीखोर आरोपी वाल्मीक कराड याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या प्रकरणाशी संबंध आणि या प्रकरणात हस्तक्षेप होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथिल सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय विश्वासू म्हणुन परिचित असलेला बीड जिल्ह्यातील खंडणीखोर आरोपी वाल्मीक कराड याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या प्रकरणाशी संबंध आणि या प्रकरणात हस्तक्षेप होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवार, 7 जानेवारी रोजी मुंबईत अजित पवार यांची भेट घेवून त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथिल सरपंच संतोष देशमुख यांचे डिसेंबर 2024 मध्ये अपहरण करुन अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आली. या घटनेस जवळपास एक महिना होत आला असून या घटनेमुळे संतोष देशमुख कुटुंबिय अत्यंत दहशतीलखाली आले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार असलेल्या वाल्मीक कराड यांच्यावर बीएनएस 103 (जुना आयपीसी 302) अन्वये खूनाचा गुन्हा दाखल करुन हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे. तसेच या प्रकरणात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचेही नाव जोडले जात असल्याने त्यांचा राजीनामा घेण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले.