बाभळगाव येथे संग्राम जामकर यांचा सत्कार

परभणी : तालुक्यातील जांब जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नवनिर्वाचित सदस्य संग्राम जामकर यांचा बाभळगाव येथे सेामवार, 23 फेब्रुवारी रोजी नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी संग्राम जामकर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत येथील नागरी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

बाभळगाव येथे सोमवारी सायंकाळी झालेल्या या सत्कार समारंभास बाभळगावचे सरपंच रामा दळवी, जांब गणाचे पंचायत समिती सदस्य सचिन लोहट, उमरी गणाचे पंचायत समिती सदस्य बाबासाहेब कांबळे, सतीश रेंगे, सुरेश रेंगे, कल्याण दळवी, विष्णू सावकार, विठ्ठल पारधे, दिनेश रेंगे आदींची उपस्थिती होती. नागरी सत्कारात उत्तर देतांना संग्राम जामकर म्हणाले की, जांब जिल्हा परिषद सर्कलचा विकास करण्यासाठी आपण वचनबध्द आहोत. तसेच ग्रामस्थांनी कोणताही संकोच न बाळगता सर्कलच्या विकासासाठी सुचना कराव्यात असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »