पिंपळगाव सराई : सर्वधर्मियांचे श्रध्दास्थान सैलानी बाबांच्या यात्रेतील महत्वाचे आकर्षण असलेला नारळांची होळी उत्सव गुरूवार 13 मार्च रोजी पार पडला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत दुपारी 3 वाजता सैलानी बाबांचे मुजावर शेख रफिक मुजावर तसेच ठाणेदार दुर्गेश राजपूत यांच्याहस्ते होळीची विधीवत पूजन करून लाखो नारळांची होळी पेटविण्यात आली.

पिंपळगाव सराई : सर्वधर्मियांचे श्रध्दास्थान सैलानी बाबांच्या यात्रेतील महत्वाचे आकर्षण असलेला नारळांची होळी उत्सव गुरूवार 13 मार्च रोजी पार पडला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत दुपारी 3 वाजता सैलानी बाबांचे मुजावर शेख रफिक मुजावर तसेच ठाणेदार दुर्गेश राजपूत यांच्याहस्ते होळीची विधीवत पूजन करून लाखो नारळांची होळी पेटविण्यात आली. होळीनंतर सैलानी बाबांच्या यात्रेला प्रत्यक्ष सुरूवात झाली आहे.
मुजावरांच्या हस्ते विधीवत पूजन करून लाखो नारळांची होळी पेटविण्यात आली.
यावेळी काही श्रध्दाळू नारळाला बाहुले, गोटे, निंबू, खेळे ठोकून ते नारळ कुटुंबातील सदस्यांच्या अंगावरून ओवाळून होळीमध्ये फेकतांना दिसून आले तर काही भाविक आपल्या अंगातील जुन्या कपड्यांचे गाठोडे पेटलेल्या होळीत टाकताना दिसत होते. तर काही भाविकांनी मनोरुग्णांच्या अंगावरून कोंबडे ओवाळून होळीमध्ये फेकले. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने होळीला प्रदक्षिणा घालून दर्शन घेतले तसेच भाविकांनी सैलानी बाबाच्या समाधीवर बोकड्यांचे कोंबड्यांचे नवस फेडून समाधीवर गलब व फुलांची चादर चढवून दर्शन घेतले. होळीसाठी गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी भाविकांची संख्या कमी आढळून आली. होळीसाठी मुजावर परिवारातील शेख रफिक मुजावर, शेख हाशम मुजावर, शेख शफिक मुजावर, शेख रशीद मुजावर,शेख चांद मुजावर, शेख जाहीर मुजावर, शेख मोहसीन मुजावर, शेख नईम मुजावर उपस्थित होते. तर प्रशासनाकडून उपविभागीय अधिकारी शरद पाटील, बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे, पंचायत समिती गटविकास अधिकारी एल. पी. सुरडकर यांच्यासह गट विकास अधिकारी धीरज जाधव, सुमित हिवाळे, नितीन पाटील, अरविंद टेकाळे, विस्ताराधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच रायपूर पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी व अधिकारी यावेळी उपस्थित होते. तर पोलीसांचा कडक बंदोबस्त होता.