transporting beef in Chhatrapati Sambhajinagar : गोवंश मांसाची वाहतूक करणारा रिक्षाचालक गजाआड

transporting beef in Chhatrapati Sambhajinagar

transporting beef in Chhatrapati Sambhajinagar : गोवंश मांसाची वाहतूक करणारी रिक्षा फुलंब्री पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी नाकाबंदी करुन पकडली. ही कारवाई शुक्रवार, 12 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास फुलंब्री ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील सावंगी येथील सारा परिवर्तन सोसायटी समोर करण्यात आली.

transporting beef in Chhatrapati Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर :  गोवंश मांसाची वाहतूक करणारी रिक्षा फुलंब्री पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी नाकाबंदी करुन पकडली. ही कारवाई शुक्रवार, 12 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास फुलंब्री ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील सावंगी येथील सारा परिवर्तन सोसायटी समोर करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 31 हजार 400 रुपये किंमतीचे 6 क्विंटल 57 किलो गोवंश मांस, एक लाख रुपये किंमतीची रिक्षा असा एकूण 2 लाख 31 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फुलंब्री पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव येथे गोवंशाची हत्या करुन त्याचे मांस रिक्षा क्रमांक (एमएच-20-इके-4115) मधून छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यात येत असल्याची माहिती फुलंब्री पोलिसांना मिळाली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी पुजा नागरे, फुलंब्री पोलिस ठाण्याचे निरीक्षक सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मुऱ्हाडे, पोलिस अंमलदार कैलास राठोड आदींच्या पथकाने सावंगी परिसरातील सारा परिवर्तन सोसायटी समोर सापळा रचून रिक्षा अडवली. पोलिसांनी रिक्षाचालक अबूजर सत्तार कुरैशी (26 वर्ष), रा.नायगाव, ता. फुलंब्री याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने सदरील मांस नायगाव येथे गोवंश जनावराची कत्तल करुन ते छत्रपती संभाजीनगर शहरातील विक्रेत्यांना देण्यासाठी घेवून जात असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »