टप्पा वाढ अनुदान निधीचा प्रश्न पावसाळी अधिवेशनात सोडवा: शालेय शिक्षण मंत्र्यांना साकडे 

जाफ्राबाद :  राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना दिनांक 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार वाढीव 20 टक्के अनुदान देण्यात यावे अशी मागणी जालना जिल्ह्यातील शिक्षकांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री 22 जून रोजी रात्री जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते यावेळी जिल्ह्यातील शिक्षकांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले या निवेदनात म्हटले आहे की, दिनांक 14 ऑक्टोंबर 2024 च्या शासन निर्णयास आगामी पावसाळी अधिवेशनात निधीची तरतूद करून या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी.

 यासाठी आझाद मैदान मुंबई येथे राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून या आंदोलनात राज्यातील बहुतांश शिक्षक सहभागी झाले आहेत शासनाने वाढीव अनुदानाचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी गेल्या वीस वर्षापासून केली जात आहे .

या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सदानंद लोखंडे, विजय सुराशे, शंकर शेरे,नागेश नागलवाड, योगेश टेके, रामेश्वर धोपटे, संदीप इंगोले, रामेश्वर कुलकर्णी, बाळू शिंदे सय्यद विकार, आरेफ खान यांच्यासह असंख्य शिक्षक बांधव यावेळी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »