पैठण : हात ऊसने घेतलेले पैसे वेळेवर परत न दिल्याच्या कारणावरुन शिवीगाळ केल्याचा राग मनात धरुन एका 38 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार, 21 जून रोजी घडली. दिपक्रांती प्रकाश पोटफोडे (38 वर्ष), रा. रामनगर, ता.पैठण असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिपक्रांती पोटफोडे हा तरुण किरायाच्या घरात राहुन मोल-मजूरी करुन उदरनिर्वाह करीत होता. घरची परिस्थिती बेताची असल्याने दिपक्रांती पोटफोडे यांनी गोरख लिंबोरे यांच्याकडून पाच हजार रुपये हातऊसने घेतले होते. परंतु त्यांना पैसे देण्यास विलंब होत असल्याने गोरख लिंबोरे, आबेद पठाण, माजी नगरसेवक बजरंग लिंबोरे, कृष्णा पंडूरे, आकाश जिरे यांनी पोटफोडे यांचया घरी जावून शिवीगाळ करीत पैसे परत देण्याची मागणी 20 जून रोजी केली होती. पत्नी व मुलांसमोर झालेल्या अपमानामुळ व्यथीत झालेल्या दिपक्रांती पोटफोडे यांनी 21 जून रोजी राहत्या घरी छताच्या हुकाला नायलॉन दोरीने बांधुन गळफास घेतला होता. हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दिपक्रांती पोटफोडे यांना उपचारासाठी पैठणच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी मयत दिपक्रांती पोटफोडे यांची पत्नी अंजली पोटफोडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गोरख लिंबोरे, आबेद पठाण, माजी नगरसेवक बजरंग लिंबोरे, कृष्णा पंडूरे, आकाश जिरे यांच्याविरुध्द पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक महादेव गोमारे करीत आहेत.