Raid on IPL Satta in Khamgaon: खामगावात आयपीएल सट्ट्यावर छापा; तिघे ताब्यात, 45 हजारांचा मुद्देमाल जप्त

Raid on IPL Satta

Raid on IPL Satta in Khamgaon: जुना बस स्टॅँड जवळ एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या आयपीएल सट्ट्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी सट्टा खेळणाऱ्या आणि खेळविणाऱ्या बुकिंवर कारवाई करत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. कारवाईत लॅपटॉपसह विविध साहित्य जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.

Raid on IPL Satta
Raid on IPL Satta

खामगाव : जुना बस स्टॅँड जवळ एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या आयपीएल सट्ट्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी सट्टा खेळणाऱ्या आणि खेळविणाऱ्या बुकिंवर कारवाई करत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. कारवाईत लॅपटॉपसह विविध साहित्य जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई एएसपी अशोक थोरात यांच्या पथकाने 15 एप्रिलच्या रात्री 10 वाजता दरम्यान केली. या कारवाईमुळे शहरातील बुकींचे धाबे दणाणले आहेत.
स्थानिक जुन्या बसस्टँण्डजवळील एका बारमध्ये काही इसम क्रिकेटवर सट्टा खेळत व खेळवित असल्याची गुप्त माहिती एएसपी पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने 15 एप्रिल रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास उपरोक्त ठिकाणी छापा मारला असता त्याठिकाणी संजयकुमार चंद्रसेन मोराणी (40) रा. सिंधी कॉलनी, नितीन सुरेशकुमार नथानी (35) रा. सिव्हील लाईन व निखील भाटीया रा. लक्कडगंज हे तिघे पैश्यांच्या हारजीतवर क्रिकेट सट्टा खेळतांना व खेळवितांना रंगेहाथ मिळून आले. पोलिसानी तिघांना ताब्यात घेवून त्यांचेजवळून 3 मोबाईल, सेटटॉप बॉक्स व रोख रकमेसह एकुण 45 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पीएसआय विनोद खांबलकर यांनी शहर पोस्टेला फिर्याद दिली. फिर्यादीवरून पोस्टेमध्ये उपरोक्त तिघांविरुध्द मजुका कलम 12 अ, सहकलम 509 भादंवि नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई एएसपी पथकाचे पितांबर जाधव, पीएसआय बिनोद खांबलकर, पोहेकॉ संदीप टाकसाळ, पोकों, प्रविण गायकवाड, देवा चव्हाण, केशव झाटे, महिला पोलिस पल्लवी बोहें, संतोष वाघ यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »