गुलाबी थंडीतही मतदारांच्या रांगा; ८ तासांत ४६.५३ टक्के मतदान

वाशिम : जिल्ह्यातील कारंजा, रिसोड, मंगरुळपीर नगरपरिषद आणि मालेगाव नगरपंचायत या चारही ठिकाणांच्या निवडणुकांसाठी मंगळवारी (२ डिसेंबर) मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरु आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि गुलाबी थंडीची जाणीव जाणवत होती. वातावरणातील गारवा असूनही मतदारांनी उत्साहाने मतदान केंद्रांचा रस्ता धरला. सकाळी साडेसात वाजता सुरू झालेल्या मतदानाला पहिल्या दोन तासांत थंड प्रतिसाद मिळाला आणि ७.१९ टक्के मतदान नोंदले गेले. थंडी, कामाची घाई आणि सकाळच्या धकाधकीमुळे प्रारंभी मतदार बाहेर पडण्यास संथ होते.

मात्र, सकाळ सरताच नागरिकांच्या उत्साहाने जोर पकडला. मतदान केंद्रांबाहेर रांगा दिसू लागल्या. साडेअकरा वाजेपर्यंत १८.८६ टक्के, तर दुपारी दीडपर्यंत ३१.८२ टक्के मतदान झाले. त्यानंतर दुपारच्या सत्रात मतदानाचा वेग वाढत गेला आणि साडेतीन वाजेपर्यंत एकूण ४६.५३ टक्के मतदान नोंदवले गेले. चार शहरांतील १७८ मतदान केंद्रांवर दिवसभर मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत सुरु असून पुढील दोन तासात मतदान आणखी वाढेल असा अंदाज आहे.  

आधी लगीन लोकशाहीचे’, रिसोडमध्ये नवरदेवाचे मतदान

रिसोड येथील मतदान केंद्रावर नवरदेव प्रशांत राजेशआप्पा काळेगावकर यांनी विवाहाच्या आधीच सहकुटुंब केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला. “प्रथम मतदान” करून त्यांनी लोकशाहीतील आपली कर्तव्यनिष्ठा जपली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »