Prime Minister Modi’s public meeting : पंडित नेहरू ते राहुल गांधी सारेच आरक्षणविरोधी – नरेंद्र मोदींचा आरोप 

Prime Minister Modi  in Dhule, Nashik

Prime Minister Modi’s public meeting : माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी दलित, मागासवर्गीय समाजास आरक्षण मिळू नये, यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आरक्षणासाठी मोठी लढाई लढावी लागली. त्यानंतर इंदिरा गांधी यांनीही एससी, एसटी यांना आरक्षण मिळू नये, यासाठी प्रयत्न केले. राजीव गांधी यांनी ओबीसी आरक्षण मिळू नये, असे काम केले.

Prime Minister Modi  in Dhule, Nashik

धुळे/नाशिक : माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी दलित, मागासवर्गीय समाजास आरक्षण मिळू नये, यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आरक्षणासाठी मोठी लढाई लढावी लागली. त्यानंतर इंदिरा गांधी यांनीही एससी, एसटी यांना आरक्षण मिळू नये, यासाठी प्रयत्न केले. राजीव गांधी यांनी ओबीसी आरक्षण मिळू नये, असे काम केले. आता त्या परिवारातील युवराज आरक्षणच्या विरोधात आहे. ते आता देशातील ओबीसींना छोट्या छोट्या जातींमध्ये वाटण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता केला.

शुक्रवारी धुळे आणि नंतर नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. राज्यातील 20 नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील आपल्या पहिल्या सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, काँग्रेस लहान-लहान जातींना आपआपसात लढवण्याचे काम करत आहे. काँग्रेसने यापूर्वी धर्माच्या नावावर कट रचला. त्यानंतर देशाची फाळणी झाली. आता काँग्रेस जातीच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे.

महाविकास आघाडी चाके, ब्रेक नसलेले वाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महाराष्ट्रातील विरोधी पक्षांची महाविकास आघाडी ही एक असे वाहन आहे ज्याला ना चाके आहे ना ब्रेक आणि तेथील प्रत्येकाला चालकाच्या सीटवर बसायचे आहे. केवळ भाजप नेतृत्वाखालील महायुतीच महाराष्ट्राचा जलद विकास सुनिश्चित करेल. आम्ही जनतेला देवाचे दुसरे रूप मानतो, पण काही लोक जनतेला लुटण्यासाठी राजकारण करत आहेत, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

काँग्रेस आता परोपजीवी बनली : मोदी

नाशिकच्या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधत या विरोधी पक्षाला त्यांच्या कृतीमुळे संपूर्ण देशाने पूर्णपणे नाकारले आहे. काँग्रेस ही आता अखिल भारतीय काँग्रेस राहिलेली नाही! काँग्रेस आता परोपजीवी काँग्रेस बनली आहे. हा काँग्रेस पक्ष आता फक्त कुशीवर टिकून आहे, असा हल्लाबोलही मोदींनी यावेळी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »