वाशिममध्ये मतदानाची तयारी पूर्ण; पोलिंग पार्टी सज्ज

वाशिम : नगरपरिषद निवडणुकीसाठी उद्या, २० डिसेंबर रोजी मतदान होणार असून, त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त मतदान अधिकारी, केंद्रस्तरीय अधिकारी व सहाय्यक अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पोलिंग पार्टी शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेपासूनच जिल्हा क्रीडा संकुलात एकत्र जमल्या होत्या.

जिल्हा क्रीडा संकुल येथे मतदान केंद्रनिहाय पथकांना ईव्हीएम मशीनसह आवश्यक मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले. ईव्हीएम मशीन ताब्यात घेतल्यानंतर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मॉक पोल घेऊन मशीन पूर्णतः सुरळीत व अचूक कार्यरत असल्याची खात्री केली. त्यानंतर मतदान केंद्रांवर अधिकारी, कर्मचारी व साहित्य सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी स्वतंत्र वाहनांची नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली होती.  ही संपूर्ण प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर आणि सहायक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी मतदान प्रक्रिया पारदर्शक, शांततेत व नियमबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासनाकडून काटेकोर तयारी करण्यात आली असून, मतदारांना निर्भय वातावरणात मतदान करता यावे यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. शनिवारी होणाऱ्या मतदानासाठी वाशिम शहरात लोकशाहीच्या उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »