Police raid Delight Cafe : जालना शहरात तरुण-तरुणींसाठी अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा धंदा कॅफे सेंटरचालकांनी सर्रास सुरू केला आहे. शहरातील मंमादेवी मंदिर ते स्टेशन रोडवरील जिंदल कॅपिटल कॉम्प्लेक्समध्ये डीलाईट कॅफेमध्ये पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे.
जालना : जालना शहरात तरुण-तरुणींसाठी अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा धंदा कॅफे सेंटरचालकांनी सर्रास सुरू केला आहे. शहरातील मंमादेवी मंदिर ते स्टेशन रोडवरील जिंदल कॅपिटल कॉम्प्लेक्समध्ये डीलाईट कॅफेमध्ये पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे.
या कॅफेमध्ये तयार करण्यात आलेल्या पार्टिशनच्या कंपार्टमेंटमध्ये बलात्कार, विनयभंगासारख्या घटनाबरोबर अश्लील चाळे करण्यात येत आहेत. महाविद्यालयीन तरुण-तरुणींना अश्या कॅफेमध्ये अवघ्या 200 रुपयात अशी जागा सहज उपलब्ध करून दिल्या जाते. शहरातील मंमादेवी मंदिर ते स्टेशन रोडवरील जिंदल कॅपिटल कॉम्प्लेक्समध्ये डीलाईट कॅफेमध्ये तरुण पिढीला वाममार्गाला लावण्याचा अश्लील धंदा सुरू असल्याची माहिती कदीम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिध्दार्थ माने यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
पोलीस निरीक्षक सिध्दार्थ माने, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे, पोलीस उपनिरीक्षक मोरे यांच्यासह पथकाने आज दुपारी अचानक या कॅफेवर छापा टाकला. यावेळी याठिकाणी बनविण्यात आलेल्या कंपार्टमेंटमध्ये काही महाविद्यालयिन तरुण-तरुणी अश्लील वर्तन करतांना आढळून आले. यावेळी कॅफेचालक शिवम गणेश भुतेकर ( वय 23,रा. निपाणी पोखरी ) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.