सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलीसच दोषी; सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचा दावा

बुलढाणा : परभणीतील  हिंसाचारानंतर पोलिसांनी काहीजणांना अटक केली होती. यापैकी सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप झाला होता. मात्र, राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाकडून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले होते. मात्र,  सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाला असून, तसे न्यायालयाने देखील सांगितले आहे, यामुळे दोषी पोलिसांवर कारवाई व्हावी अशा शब्दांत सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मागणी केली 

   सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाईचे नेते आठवले हे मंगळवारी बुलढाणा दौऱ्यावर होते. बुलढाणा येथील विश्राम गृहात त्यांनी स्थानिक माध्यमांशी संवाद साधला. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईच्या बाजूने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी स्वत: युक्तिवाद केला. यावर आपले मत काय? असे विचारले असता, ते म्हणाले सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाला! तसे न्यायालयाने देखील सांगितले, असे ते म्हणाले.  याशिवाय, बिहारमध्ये महाबोधी महाविहार येथील आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगत बोधगया टेम्पल कायदा  १९४९ रद्द करण्यासाठी हे आंदोलन केले जात आहे. हा राज्याचा विषय असून केंद्र सरकार यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, हा कायदा रद्द व्हावा, हीच आमची मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले. बिहार राज्यात ‘एनडीए’चेच सरकार बनेल असा दावाही त्यांनी बोलून दाखविला. 

मोदी, ठाकरे आणि राणेंवरही बोलले 

खा. कंगना रणाऔत यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना देवाशी केल्याच्या वक्तव्यावर ‘मोदी देवाचा नव्हे, तर मानवाचा अवतार असल्याचे ते म्हणाले. तसेच नितेश राने यांचा आक्रमक पणा हा सरकारचा मुद्यावर नसून ती त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे. एवढेच नाही तर, राज ठाकरें विषयी बोलताना ‘ते सोबत होते तरी आम्हाला काही फायदा झाला नाही’ असा टोला त्यांनी लगावला. तर उद्धव ठाकरे आमच्या सोबत असते तर त्यांची ‘ही अवस्था नसती असेही ते म्हणाले. 

‘राज्यमंत्रीमंडळात रिपाईला स्थान हवे’

महायुतीमध्ये रिपाई घटक पक्ष असून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाने महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे, राज्यात देखील मंत्रीमंडळात रिपाईला स्थान मिळावे, अशी मागणी आठवले यांनी फडणवीस सरकारकडे केली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »