खामगाव : शहरातील सुटाळपुरा भागातील जामोदे परिवारावर काळाने घाला घातला असून देवदर्शनासाठी मलकापूर तालुक्यातील निंबा देवी येथे गेलेल्या मायलेकीचा विश्वगंगा नदीमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 15 जून रोजी सकाळी उघडकी आली.

स्थानिक सुटाळपुरा भागातील गढीजवळ राहणारे मयूर जामोदे हे त्यांची पत्नी पुनम मयूर जामोदे (32) व चिमुकली आर्वी जामोदे (5) यांच्यासह 15 जून रोजी सकाळी मलकापूर तालुक्यातील निंबा देवी संस्थान येथे देवीच्या दर्शनासाठी गेले होते. या ठिकाणी विश्वगंगा नदी पात्राजवळ पुनम जामदे आणि चिमुकले आर्वी हे दोघे पाय धुण्यासाठी गेले असता पाण्यात खेळताना चिमुकली आर्वी हिचा पाय खोलात गेला आणि ती पाण्यात बुडाली मुलीला वाचविण्यासाठी आई पूनम हिने सुद्धा पाण्यात उडी घेतली असता ती सुद्धा पाण्यामध्ये बुडून वाहून गेली. बघता बघता दोघी मायलेकी पाण्यामध्ये बुडाल्या. यावेळी जवळ उपस्थित असलेले मयूर जामुदे आणि नागरिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु दोघेही खोल पाण्यात बुडाले होते. काही वेळाने दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आले. घटनेची माहिती मिळताच मलकापूर येथील ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तसेच शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच बचाव कार्य सुद्धा केले परंतु त्यांना यश आले नाही. या दुर्दैवी घटनेमुळे खामगाव शहरातील सुटाळपुरा भागांमध्ये नागरिकांकडून एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.