dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

कृषी विभाग अॅक्शन मोडवर; दहा बियाणे विक्रेत्यांचे परवाने निलंबित: एकाचा परवाना कायमस्वरूपी रद्द

छत्रपती संभाजीनगर :  जिल्ह्यातील दहा कृषी सेवा केंद्रचालकांना खरीप हंगामात सरकी बियाणे जादा दराने विक्री करणे, लिंकिंग करूनच अनुदानित खताची विक्री करणे आणि नियम पायदळी तुडविणे कृषी सेवा केंद्रचालकांच्या अंगलट आले आहे. कृषी अधीक्षकांनी शनिवारी सुनावणी घेत एका कृषी सेवा केंद्रचालकाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला, तर अन्य एकाचा परवाना ३१ मार्चपर्यंत आणि अन्य आठ दुकानांचे परवाने ९० दिवसांसाठी निलंबित केले.

खरीप हंगामासाठी शेतकरी बाजारात बियाणे, खते आणि कीटकनाशक खरेदीसाठी येत आहेत. शासनाने सरकी बियाण्यांचे दर निश्चित केले. यापेक्षा अधिक दराने बियाणे विक्री करू नये, असे निर्देश आहेत. असे असताना पैठण येथील चिंतामणी सीइस, गंगापूर येथील वैभव मशीनरीज आणि वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथील महाराष्ट्र अॅग्रो सर्व्हिसेस यांनी सरकी बियाणे जादा दराने विक्री करत असल्याचे भरारी पथकाला आढळून आले. वैभव मशिनरीज या दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिले. चिंतामणी सीड्सचा परवाना ३१ मार्च २०२६ पर्यंत निलंबित केला. अनुदानित खते लिंकिंग करून विक्री करताना गंगापूर तालुक्यातील दहेगाव येथील किसान एजन्सी, मेहराज एजन्सी, उत्कर्ष कृषी सेवा केंद्र, हरिओम कृषी सेवा केंद्र आणि सद्‌गुरू कृषी सेवा केंद्रचालक आढळून आले.

या दुकानांचे परवाने ९० दिवस निलंबित करण्यात आले आहेत. लासूर येथील अरिहंत कृषी सेवा केंद्र लोहगाव येथील ओम अॅग्रो एजन्सी यांनी बियाणे विक्री करताना नियमांचे पालन केल्याने त्यांचे लायसन्स एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आले. वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील महाराष्ट्र अॅग्रो सर्व्हिसेस या बियाणे विक्रेत्याचा परवाना ९० दिवसांसाठी निलंबित करण्यात आल्याचे जिल्हा गुणनियंत्रण व गुणवत्ता निरीक्षक हरिभाऊ कातोरे यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top