Pedestrian crushed by unknown vehicle: अज्ञात वाहनाने पादचाऱ्यास चिरडले, पादचारी जागीच ठार

Pedestrian crushed by unknown vehicle

Pedestrian crushed by unknown vehicle: नांदुरा-जळगांव जामोद रोडवरील हॉटेल शिवनेरी समोरून पायी जाणाऱ्या एका व्यक्तीस अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना ३ एप्रिल रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

Pedestrian crushed by unknown vehicle
Pedestrian crushed by unknown vehicle

नांदुरा (जि. बुलढाणा): नांदुरा-जळगांव जामोद रोडवरील हॉटेल शिवनेरी समोरून पायी जाणाऱ्या एका व्यक्तीस अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना ३ एप्रिल रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. मृतक वीर बहादुर पुन केसर पुन (३५) हा नेपाळ येथील रहिवासी असून तो नांदुरा येथील हाॅटेलवर काम करत होता.

प्राप्त माहितीनुसार, मृतक वीर बहादूर पुन केसर पुन हे त्यांच्या रूमवर पायी जात असतांना त्यांना समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी हाॅटेल मॅनेजर नरेशकुमार सबीर राणा (नांदुरा रा. ग्राम सिमा ता. शिवालय जि. जाजलकोट नेपाल ह. मु. सुदर्शन नगर नांदुरा) यांच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी ओम साई फाउंडेशनचे रुग्णवाहिका सह स्वयंसेवक अश्विन फेरण, विलास निबोळकर, कृष्णा नालट तसेच नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील, पोलीस कर्मचारी इंगळे, वराळे, सुनील सुशीर, रवि झगरे, कैलास सुरळकर यांनी मदत कार्य केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »