बुलढाणा : बुलढाणा-चिखली रोडवर वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर वाहनधारकांवर कारवाई सुरू केली आहे. मात्र ही कारवाई नियमबद्ध आहे की केवळ वसुलीसाठी? असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. 3000 रुपये द्या तर पावती मिळेल, पण 300 रुपये दिले तर गाडी त्वरित सोडली जाईल, असा प्रकार बुलढाणा चिखली मार्गावर सुरू आहे.

बुलढाणा : बुलढाणा-चिखली रोडवर वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर वाहनधारकांवर कारवाई सुरू केली आहे. मात्र ही कारवाई नियमबद्ध आहे की केवळ वसुलीसाठी? असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. 3000 रुपये द्या तर पावती मिळेल, पण 300 रुपये दिले तर गाडी त्वरित सोडली जाईल, असा प्रकार बुलढाणा चिखली मार्गावर सुरू आहे.
बुलढाणा चिखली हा अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावरून दिवस-रात्र वाहनांची रांग लागलेली असते. त्यामुळे वाहतूक पोलिसांचेही वाहन चालकांवर दंड करण्याचे चांगलेच फावते. वाहतूक पोलिसांची ही कारवाई शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये न करता शहराच्या बाहेरील रस्त्यांवर अधिक सुरू आहे. विशेष म्हणजे महिला वाहतूक पोलीसही यामध्ये आघाडीवर आहेत. वाहन पकडल्यानंतर तीन हजार रुपयांची पावती फाडा असा आग्रह सुरुवातीला होतो. चालकांनी परवाना किंवा वाहनांची कागदपत्रे दाखवल्यानंतर पाचशे ते तीनशे रुपयांमध्ये गाडी सोडून दिल्या जात असल्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती काही वाहन चालकांनी दिली आहे. ही वसुली आहे की नियमाला धरून दंड? प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे बुलढाणा शहरातील वाहतूक कोंडी आणि दुसरीकडे पोलीस शहराच्या बाहेर वाहने पकडण्यासाठी जातात. वाहतूक शाखेचा हा गोंधळ वाहतूक सेवेवर परिणामकारक ठरत आहे. यासंदर्भात जिल्हा वाहतूक शिक्षकांशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.
शहरात वाहतूक कोंडी कायम, पण पोलिस कुठे?
बुलढाणा शहरात वाहतूक कोंडी हा जणू रोजचा प्रश्न झाला आहे. संगम चौक, जयस्तंभ चौक, तहसील चौक, बस स्थानक परिसर, बाजारपेठेतील अरुंद रस्ते या ठिकाणी नियमांचे सर्रास उल्लंघन होत असतानाही तिथे कारवाईचे फारसे निशाण दिसत नाही. पण शहराच्या बाहेर, विशेषतः चिखली रोडवर, पोलिसांची सक्रियता वाढली आहे. गाड्या थांबवून कागदपत्रांची तपासणी, हेल्मेट आणि पीयूसी प्रमाणपत्रांची चौकशी केली जात आहे. नियमभंग करणाऱ्यांवर दंड आकारला जातोय, पण त्यातही ‘घसघशीत सूट’ दिली जात असल्याच्या तक्रारी आहेत.
नागरिकांत नाराजी
वाहतूक पोलिसांची अशी ‘निवडक’ कारवाई आणि दंडाच्या बदल्यात सूट देण्याची कथित पद्धत नागरिकांच्या रोषाचा विषय बनत आहे. “शहरात नियम तोडणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, पण ती पारदर्शक आणि एकसमान पद्धतीने व्हावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.