पाणंद रस्ता शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा : आमदार अमित झनक

रिसोड  : शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेतीकामासाठी, शेतात ये–जा करण्यासाठी तसेच ग्रामीण दळणवळणासाठी पांदण रस्त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असून पांदण रस्ता हा शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे पाणंद रस्ते विकसित करण्यासाठी  ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांनी समन्वयाने विशेष पुढाकार घ्यावा, असे आवाहन  आमदार अमित झनक यांनी केले.

रिसोड येथील तहसील कार्यालयात १ जानेवारी रोजी झालेल्या मुख्यमंत्री पांदण रस्ता योजना व घरकुल योजनांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.या बैठकीस उपविभागीय अधिकारी तथा सचिव वैशाली देवकर, तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, रिसोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण, वैभव सरनाईक यांच्यासह भूमिलेख अभिलेख कर्मचारी, महसूल कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.  बैठकीदरम्यान पांदण रस्त्यांच्या कामांतील अडथळे, मोजणी व अभिलेख अद्ययावत करणे, घरकुल लाभार्थ्यांच्या प्रकरणांचा त्वरित निपटारा, तसेच विभागांमधील समन्वय वाढविण्याबाबत ठोस सूचना देण्यात आल्या. योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामीण भागातील शेतकरी व गरजू कुटुंबांना दिलासा देण्यावर भर देण्यात आला. 

या आढावा बैठकीमुळे पांदण रस्ता व घरकुल योजनांच्या कामांना गती मिळेल, असा विश्वास उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »