Operation All Out: ऑपरेशन ऑलआऊट अंतर्गत जाफ्राबाद पोलिसांची जुगार, दारु अड्ड्यांवर कारवाई

ऑपरेशन ऑल आऊट
 Operation All Out: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जाफ्राबाद पोलीस स्टेशन हद्दील ऑपरेश ऑलआऊट राबविण्यात आले.
माहोरा : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जाफ्राबाद पोलीस स्टेशन हद्दील ऑपरेश ऑलआऊट राबविण्यात आले. यामध्ये पोलिसांनी जुगार, दारु अड्ड्यावर कारवाई करत नॉन बेलेबल वॉरंटची अंमलबजावणी केली.
 जालना पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार, 29 मार्च रोजी रात्री 11 ते 30 मार्चच्या पहाटे तीन वाजेपर्यंत जाफ्राबाद हद्दीत ऑपरेश ऑलआऊट राबविण्यात आले. या मोहिमेमध्ये एक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, 10 पोलीस अंमलदार आणि 10 होमगार्ड यांचा समावेश होता. या मोहिमेदरम्यान न्यायालयाकडून वारंवार समन्स आणि वॉरंट काढून सुद्धा न्यायालयात हजर न होणाऱ्या नॉन बेलेबल वॉरंटमधील आरोपींचा शोध घेण्यात आला.
यामध्ये संजय मोतीराम खंदारे (रा. बोरगाव मठ), शंकर देविदास घाडगे (रा.बोरगाव मठ), औधितराव किसन नरवडे, भानदास रामदास काकडे (रा. सिंधी), भानदास गोपाळा गांडुळे (रा. माहोरा), शंकर रामदास दिवटे (रा.जाफ्राबाद), सचिन विश्वनाथ फोलाने (रा. जाफ्राबाद), गुलाबराव तुकाराम भांबळे (रा. देऊळगाव झरी), नितीन गुलाबराव भांबळे (रा. देऊळगाव), संजय साहेबराव मिचके (रा. कुंभारी), सुभाष दौलतराव भांबळे (रा.सिपोरा अंभोरा), संदीप चंद्रभान उबाळे (रा. वरखेडा विरो) या आरोपींना अटक करुन न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या चार तासांच्या ऑलआऊट ऑपरेशनमध्ये जुगार, दारुबंदी कायद्यांतर्गंत कारवाई करुन संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुश नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलीस उपनिरीक्षक विजय तडवी, एस.डी. तायडे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »