ड्रायव्हिंग लायसन्सच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक; बनावट वेबसाईटचा सूत्रधार बिहारमधून जेरबंद; एलसीबी – सायबर पोलिसांची कारवाई

जालना :  लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स मिळवून देण्याच्या नावाखाली नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीचा जालना पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बनावट सरकारी वेबसाईट तयार करून थेट संगणक प्रणालीत अनधिकृत प्रवेश करत आर्थिक लूट करणारा मुख्य आरोपी बिट्टराज प्रमोद यादव ( रा. सहरसा, बिहार ) याला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलीस ठाण्याने संयुक्तपणे केली.

     ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रियेचा गैरवापर करत आरोपी नागरिकांना बनावट लर्निंग लायसन्स उपलब्ध करून देत होता. या प्रकरणी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे येथील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अभीजित बावस्कर यांनी शुक्रवार, २६ नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली होती. तपासात बनावट वेबसाईट, खोटे लॉगिन्स आणि डिजिटल साधनांचा वापर करून मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.

पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक बिहारमध्ये रवाना झाले. पटना ते सहरसा जिल्ह्यात शोधमोहीम राबवून आरोपीस अटक करण्यात आली. त्याच्याकडून लॅपटॉप, आयफोन व थंब मशीनसह १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या गुन्ह्यात यापूर्वी जम्मू–कश्मीर व जालना येथील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून हे आंतरराज्यीय सायबर फसवणूक रॅकेट असल्याचे निष्पन्न झाले आहे.

चार दिवसांची न्यायालयीन कोठडी 

 अटक आरोपीस न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सरकारी ऑनलाईन सेवांच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीविरोधात जालना पोलिसांची ही कारवाई महत्त्वपूर्ण ठरली असून नागरिकांनी अशा बनावट वेबसाईट्सपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »