शहागड : अबंड तालुक्यातील बसस्थानकासमोरील एका मोबाईलच्या दुकानात मोबाईलवरून शिवीगाळ केल्याप्रकरणी विचारपूस करण्यासाठी गेलेल्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत कटरने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली.

दरम्यान, याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात एकावर ॲट्रासिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सुरेश येटाळे ( रा.वाळकेश्वर, ता.अंबड ) यांनी राजेश राऊत यांच्या मोबाईलवर फोन केला. परंतु तो दुसऱ्यानेच उचलून सुरेश येटाळे यांना शिवीगाळ केली.
दरम्यान, सुरेश येटाळे व पुतण्या विशाल येटाळे यांनी राजेश राऊत यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी विचारपूस केली असता,सचिन जाधव ( रा.शहागड, ता.अंबड ) याने माझ्या मोबाईल वरून शिव्या दिल्याचे राजेश राऊत यांनी सांगितले. यावेळी सुरेश येटाळे व पुतण्या विशाल येटाळे यांनी सचिन जाधव याला विचारण्यासाठी गेले असता सचिन जाधव याने सुरेश येटाळे व पुतण्या विशाल येटाळे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जवळील कटरने पोटावर, हातावर वार करून गंभीर जखमी केले. जातीवाचक उल्लेख करत शिवीगाळ केली. दरम्यान, गंभीर जखमी विशाल येटाळे याला प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांची घटनास्थळी भेट दिली.