गोळेगाव : सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथील श्री तारादेवी यांची यात्रा 1 व 2 फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडली. यात्रोत्सव काळात देवीच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज सेवा केंद्र गोळेगाव यांच्या वतीने आजी-माजी सैनिकांच्या हस्ते सरबताचे वाटप करण्यात आले.

दांडी पौर्णिमेनिमित्त गोळेगाव येथील श्री तारादेवी यांची यात्रा 1 व 2 फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडली. यात्रोत्सव काळात सिल्लोड, सोयगाव, पाचोरा, भोकरदन, जाफ्राबाद तालुक्यातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यात्रोत्सव काळात कडाक्याच्या उन्हात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना आजी-माजी सैनिकांच्या हस्ते सरबत वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी गोळेगाव येथील जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज सेवा केंद्राच्या पदाधिकारी व सेवकांनी परिश्रम घेतले. आजी-माजी सैनिकांनी सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या या उपक्रमामुळे भाविकांनी समाधान व्यक्त व्यक्त केले.