नाचनवेल : कन्नड तालुक्यातील नाचनवेल चौफुली फाटा ते डोंगरगाव फाटा रस्ता दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरु केले आहे. नाचनवेल चौफुली फाटा ते डोंगरगाव फाटा रस्त्याची दूरवस्था या मथळ्याखाली दैनिक ‘महाभूमि’ ने बातमी बुधवार, 17 डिसेंबर रोजी प्रकाशित केली होती. त्या बातमीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम गुरुवार, 18 डिसेंबर रोजी सुरु केले आहे.

कन्नड तालुक्यातील राज्य रस्ता क्रमांक 48 पाचोरा, घाटनांद्रा, शेलगाव, नाचनवेल, बाबरा, कान्होरी, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर हा अत्यंत कमी अंतराचा खानदेश ला जोडणारा रस्ता आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. मात्र नाचनवेल चौफुली फाटा ते डोंगरगाव फाटा अंदाजे दीड ते दोन किलोमीटर रस्त्याची दूरवस्था होवून त्यवर जीवघेणे खड्डे निर्माण झाले होते. तसेच त्या खड्यात दुचाकीचा अपघात होवून दुर्गाबाई सुभाष आग्रे या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, 11 डिसेंबर रोजी घडली होती. त्याबाबतचे वृत्त दैनिक ‘महाभूमि’ने बुधवारी प्रकाशित केले होते.