Municipal Elections : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा जोरदार कामगिरी केली आहे. राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकांमध्ये शंभराहून अधिक ठिकाणी भाजपचे कमळ फुलले आहे.

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा जोरदार कामगिरी केली आहे. राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकांमध्ये शंभराहून अधिक ठिकाणी भाजपचे कमळ फुलले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र चांगली प्रदर्शन करण्यात अपयश आले आहे. महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षापैकी काँग्रेसलाच चांगले प्रदर्शन करता आले आहे.
राज्यातील २८८ नगराध्यक्षपदाच्या जागांपैकी २७३ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यात तीन ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या होत्या. तिथे भाजपने आधीच गुलाल उधळलेला आहे.
नगराध्यक्षपदाच्या २७३ पैकी ११४ जागांवर भाजपने विजय मिळवत मुसंडी मारली आहे. भाजपनंतर शिंदेंच्या शिवसेनेला चांगली कामगिरी करता आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे ४७ ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही ३७ ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत यश मिळाले आहे.
