छत्रपती संभाजीनगर : शहराला पाणी पुरवठा करणारी 1400 मिमी व्यासाची एक्सप्रेस जलवाहिनी फुटून जालान नगरातील दुकानात आणि घरात पाणी शिरुन नागरिकांचे नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या 11 नागरिकांना महानगरपालिकेच्या वतीने सेामवार, 21 जुलै रोजी नुकसान भरपाईचे धनादेश मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या हस्ते देण्यात आले.

शहराला पाणी पुरवठा करणारी 1400 मिमी व्यासाची एक्सप्रेस जलवाहिनी फुटून जालान नगरातील दुकानात आणि घरात पाणी शिरुन नागरिकांचे नुकसान झाले होते. ही घटना 10 जून 2024 रोजी घडली होती. त्यावेळी नुकसान झालेल्या मालमत्ताधारकांनी महापालिकेकडे नुसान भरपाई देण्याची मागणी केली होती. नुकसान भरपाई अदा करण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार कार्यप्रणाली निश्चित करण्यात येऊन 11 नागरिकांना सोमवारी नुकसान भरपाई देण्यात आली. मनपा मुख्यालयात मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या हस्ते विशाखा रॉय यांना नुकसान भरपाईचा धनादेश देण्यात आला. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे, लेखा अधिकारी संजय कोलते यांची उपस्थिती होती.