MP Sandipan Bhumre in Central Cooperation Committee : केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या एकूण सोळा जणांच्या केंद्रीय सहकार समितीमध्ये छत्रपती संभाजीनगरचे खा. संदिपान भुमरे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या एकूण सोळा जणांच्या केंद्रीय सहकार समितीमध्ये छत्रपती संभाजीनगरचे खा. संदिपान भुमरे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. संसदीय कार्य मंत्रालयाने नुकतेच या संदर्भात अदेश काढले असून लोकसभेच्या नऊ तर राज्य सभेच्या चार खासदारांचा यात समोवश आहे. मराठवाड्यातील एकमेव महिला राज्यसभा सदस्या रजनीताई पाटील यांनाही समितीत प्राधान्य देण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघाचे चार वेळा आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रोहयो मंत्री राहिलेले संदिपान भुमरे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव करून लोकसभेत पोहोचले आहेत. ते छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असून ग्रामीम भागाशी दांडगा संपर्क असललेले शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत. भुमरे यांची आता थेट केंद्रीय सहकार समितीमध्ये सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला त्यांचा आर्थिक हातभार लागणार असल्याचा विश्वास स्थानिक नेते व्यक्त करीत आहेत.
याशिवाय केंद्रीय राज्य सहकार मंत्री मुरलीधर मोहळ यांचाही या समितीत सहभाग असून सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील, बीडच्या राज्य सभा सदस्या रजनीताई अशोक पाटील या अन्य तीन मराठी खासदारांचाही केंद्रीय सहकार समितीमध्ये समावेश आहे. तर राज्य मंत्री कृष्ण पाल, शिवमंगलसिंह तोमर, करण भूषण सिंह, श्रेयस एम पटेल, सुरेश कुमार शेटकर, अनुराग शर्मा, पूनमबेन माडम, भरतसिंह डाबी या लोकसभा तर एन आर इंलांगो, नरेस बंसल, लहर सिरोया या राज्यसभा सदस्यांचा समितीत सहभाग आहे.