धामणगाव बढे परिसरात ५० पेक्षा जास्त मेंढ्यांचा संशयास्पद मृत्यू! 

बुलढाणा : जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे परिसरात ५० पेक्षा अधिक  मेंढ्यांचा संशयास्पद  मृत्यू झाल्याची घटना आज  सकाळी उघडकीस आली. 

बुलढाणा : जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे परिसरात ५० पेक्षा अधिक  मेंढ्यांचा संशयास्पद  मृत्यू झाल्याची घटना आज  सकाळी उघडकीस आली. 

    धामणगाव बढे परिसरातील रिधोरा खंडोपंत येथे शहाजी बोरसे व मारोती दामा मोरे यांच्या शेताजवळ मेंढपाळ नाना चत्रु गोरे रा.सहस्रीमुळी यांच्या मालकीच्या ह्या ५० पेक्षा अधिक मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या मेंढ्यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. परंतु कशामुळे मेंढ्या मृत्यू पावल्या याबाबतची माहिती तपासणी नंतरच समोर येईल. या घटनेमुळे मेंढपाळाचे लाखो रुपयांच्यावर नुकसान झाले आहे. संबंधित विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »