राजूर घाटात दुधाचा टँकर पलटी;  लाखोंचे नुकसान

बुलढाणा : मलकापूर – बुलढाणा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या राजूर घाटातील एका वळणावर दूध वाहून नेणारा टँकर ब्रेक फेल झाल्याने पलटी झाला. यामध्ये टँकरमधील लाखो लिटर दूध रस्त्यावर सांडले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवित हानी झाली नाही. मात्र लाखो रूपयांचे नुकसान झाले.ही घटना रविवार 20 एप्रिलच्या दुपारी 1 वाजे दरम्यान घडली.

बुलढाणा तालुक्यातील धाडच्या दूध संकलन केंद्रातून दूध घेऊन अमर दूध डेअरीचा टँकर बोदवड येथील दूध प्रक्रिया प्रकल्पाकडे जात असतांना राजूर घाटातील देवीच्या मंदिरा जवळ धोकादायक वळणावर अचानक टँकरचे  ब्रेक फेल झाले. त्यामुळे टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टॅाकर अनियंत्रीत होऊन पलटी झाले. सुदैवाने  टँकर रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झाल्यामुळे मोठी हानी टळली. अपघातात टँकर चालकाला किरकोळ इजा झाली असली तरी जीवित हानी टळली.

राजूर घाटातील रस्त्यावर दुधाची गंगा

घाब्टात टँकर पलटी झाल्यामुळे टँकरमधील दूध रस्त्यावर खळखळ वाहू लागले होते. त्यामुळे घाब्ब्ब्ब्टात दुधाची गंगा वाहत असल्याचा भास होत होता. मोताळाकडून बुलढाणाकडे येणारे व बुलढाणाहून मोताळाकडे जाणारे दुचाकीस्वार व इतर वाहन चालक आपआपली वाहने थांबवून रस्त्यावरून वाहणारे दूध असहाय्यपणे बघत होते.

वाहतुकीची कोंडी

र्टॅकर पलटी झाल्याने घाटात दोन्ही बाजूकडून येणारी वाहने रस्त्यावरच थांबली असल्याने थोडावेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. 

अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांची गरज

बुलढाणा – मलकापूर रोडवरील राजूर घाटात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ राहते. घाटातील काही वळणावर दिशादर्शक फलके नसल्याने अनोळखी वाहन चालकांना रोडबाबतचे संकेत मिळत नाहीत परिणामी छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना घडत असतात. त्यामुळे घाटातील अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »