बीड : वाल्मीक कराडवर अखेर मकोका अंतर्गत मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी निगडीत खंडणी प्रकरण आणि हत्येच्या प्रकरणात ही कारवाई केल्याचे समजते.

बीड : वाल्मीक कराडवर अखेर मकोका अंतर्गत मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी निगडीत खंडणी प्रकरण आणि हत्येच्या प्रकरणात ही कारवाई केल्याचे समजते. दरम्यान, वाल्मीक कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि पवनचक्की खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मीक कराडला न्यायालयाने मकोका लावला आहे, तसेच त्याला १४ दिवसांची कोठडीही सुनावली आहे. 14 जानेवारी रोजी कराडची कोठडी संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याच्यावर मकोका लावण्याचा निर्णय दिला. याची माहिती मिळताच परळीत कराडचे समर्थक आक्रमक झाले असून त्यांनी परळी बंदची हाक दिली आहे. शहरातील बाजारपेठा बंद ठेवल्या असून रस्त्यांवर टायर पेटवण्यात आले आहे. त्यामुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. बीडमध्ये गाजत असलेले संतोष देशमुख हत्याप्रकरणी या आधी या प्रकरणातील सात आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता वाल्मिक कराडलाही या कायद्याच्या अंतर्गत आणण्यात आले आहे.