भोकरदन तालुक्यात अडीच लाखांचा गांजा जप्त

धावडा : भोकरदन तालुक्यातील कल्याणी गावात एकाने चक्क बेकायदेशीररित्या गांजाची शेती फुलवल्याचा प्रकार पारध पोलीसांनी उघडकीस आणला. शेतात सापळा लावून केलेल्या या कारवाईत पथकाने तब्बल 2 लाख 34 हजार 600 रुपयांचे गांजाची झाडे जप्त केली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

नंदुसिंग जादुसिंग चांदा (37), रा. कल्याणी, ता. भोकरदन असे या कारवाईत अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कल्याण गावातील गट क्रमांक 347 मधील शेतात एकाने गांजाची झाडे लावलेले असल्याची माहिती पारध पोलीस मिळाली होती. यावरून सहायक पोलीस निरीक्षक एस.डी.माने यांनी पथकासह सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्या शेतात सापळा लावला. यावेळी नंदुसिंग याने आपल्या घराजवळ चक्क गांजाची शेतीच फुलवल्याचे आढळून आले. शेतातील सर्व हिरवीगार झाडे ताब्यात घेतले. 2 लाख 34 हजार 600 रूपयांचा हा गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक नेमाणे यांच्या फिर्यादीवरून नंदुसिंग चांदाविरूध्द गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक माने, उपनिरीक्षक नेमाणे, एस.सी.खिल्लारे आदींच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »