मानोरा शहर कडकडीत बंद; दुपारपर्यंत बाजारपेठेत शुकशुकाट

मानोरा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने मानोरा शहरात शोककळा पसरली. त्यांच्या श्रद्धांजलीसाठी २९ जानेवारी रोजी दुपारपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता मानोरा शहरातील सर्व दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच बुधवारी मानोरा शहरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर व्यापारी बांधवांनी एकत्र येत श्रद्धांजली अर्पण म्हणून गुरुवारी दुपारपर्यंत बंद पाळण्याचे आवाहन केले. या आवाहनाला शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली.

दुपारपर्यंत संपूर्ण बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला. व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी दिवंगत नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत एकसंघतेचे दर्शन घडविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »