परभणी : मानवत शहराच्या विकासासाठी निवडणुकीच्या प्रचारावेळी दिलेला वचननामा पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन आमार राजेश विटेकर यांनी शुक्रवार, 2 जानेवारी रोजी केले. मानवत शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा राणी अंकुश लाड यांनी यावेळी आपल्या पदाचा पदभार स्विकारला.

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत मानवत शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले. या निवडणुकीत राणी लाड या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक नगरसेवक या निवडणुकीत विजयी झाले. निवडणुकीदरम्यान अंकुश लाड यांनी मेहनत घेतल्याने तसेच विकास कामांच्या जोरावर मानवतकरांनी आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविणार असल्याचे आमदार राजेश विटेकर यांनी सांगितले. दरम्यान, मानवत शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा राणी लाड यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारला. यावेळी पाथरी विधानसभा आमदार संघाचे आमदार राजेश विटेकर, अंकुश लाड आदींची उपस्थिती होती.