शिक्षणाच्या माध्यमातून आपले व्यक्तिमत्व वैश्विक बनवावे : प्रा. डॉ. नाझिया हबीब

परभणी :  विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या अंतर्मनाची शक्ती जागृत करून आपले व्यक्तिमत्व वैश्विक बनवावे. तसेच आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त जमा झालेल्या रक्कमेतून शेतकरी पालकांच्या पाल्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्धार आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रा. डॉ. नाझिया हबीब यांनी व्यक्त केला. धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पॉवर ऑफ एज्युकेशन… थिंक ग्लोबल या विशेष कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के हे होते. याप्रसंगी इंग्लड येथील अर्थशास्त्रज्ञ कॅमेरोन हाफ, कॉमनवेल्थ युथ ब्रॅड ॲम्बेसेडर दारासिंग खुराना, राकेश खुराना, ओयासिस इंग्लिश स्कूलचे संचालक महेंद्र मोताफळे, प्रा. भीमराव खाडे, केशव दुधाटे, ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या सचिव प्रा. शितल सोनटक्के, अण्णा जगताप आदींची उपस्थिती होती. प्रा. डॉ. नाझिया हबीब, ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के यांच्या हस्ते शाहू,फुले आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शितल सोनटक्के यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »