Make Bhavana Gawli the Guardian Minister; Activists’ haste: भावना गवळी यांना पालकमंत्री करा; कार्यकर्त्यांचा उतावळेपणा 

Make Bhavana Gawli the Guardian Minister; Activists’ haste: मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेणार अजूनही ठरलेले नसल्याने महायुतीत अंतर्गत कलह सुरू असल्याचे दिसून येते. असे असताना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद भावनाताई गवळी यांना देण्यात यावे. अशी मागणी वाशिम जिल्ह्यात सुरू झाली आहे. 

गजानन देशमुख /वाशीम : राज्यात महायुतीचे 224 आमदार निवडून आले असले तरी त्यांचा  सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेणार अजूनही ठरलेले नसल्याने महायुतीत अंतर्गत कलह सुरू असल्याचे दिसून येते. असे असताना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद भावनाताई गवळी यांना देण्यात यावे. अशी मागणी वाशिम जिल्ह्यात सुरू झाली आहे. 

 यासाठी काही ठिकाणी फ्लेक्स द्वारे  तसेच पत्रकार परिषद द्वारे कार्यकर्ते भावनाताईंना मंत्रिपद देण्याची मागणी करताना दिसत आहे. मात्र राज्यातील परिस्थिती बघता अद्याप भाजपा शिवसेना राष्ट्रवादी यांच्या वाट्याला कोणती पदे येणार असल्याचे निश्चित झाले नाही. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे हे आपल्या गावी गेल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. शिवसेनेला नेमकी किती मंत्रिपदे मिळणार हे अजूनही स्पष्ट झाले नसल्याने विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या विधान परिषदेच्या आमदार भावनाताई गवळी यांना शिवसेनेकडून मंत्रीपद देण्यात येईल का नाही याबाबत अजूनही शंका आहे. भावनाताई गवळी हया शिवसेनेच्या फायर ब्रॅण्ड नेत्या असल्या तरी भाजपकडून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे तसेच कामात कमिशन मागितल्याचे आरोप आहेत. भाजपाकडून भावनाताई गवळी यांच्या नावाला मंत्री पदासाठी हिरवा झेंडा मिळेल किंवा नाही हे अजून तरी सांगता येत नसल्याचे राजकीय जाणकार बोलतात भावनाताईंना मंत्रिपद दिल्यास निश्चितच वाशिम जिल्ह्याचा विकास होईल. मात्र भाजपाच्या अधिकच्या जागा निवडून आल्याने शिवसेनेला किती मंत्रीपद देण्यात येते यावर ते ठरेल. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील भावनाताईच्या कार्यकर्त्यांचा सद्यातरी हा उतावळेपणाच म्हणावा लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »