‘माहेर’ च्या रक्षाबंधनामुळे बहिणींच्या चेहर्‍यावर हास्य फुलले : बंधुप्रेमाला पारखे झालेल्या बहिणींसाठी रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात 

जालना : बहीण भावाच्या पवित्र नात्याला रेशीमबंधाने अधिक घट्ट करणाऱ्या रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून जालना येथील अंजनी फाऊंडेशनच्या वतीने भावाचे प्रेम न लाभलेल्या बहिणींसाठी ‘माहेर’ हा खास उपक्रम शुक्रवारी, 9 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला. 

जालना : बहीण भावाच्या पवित्र नात्याला रेशीमबंधाने अधिक घट्ट करणाऱ्या रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून जालना येथील अंजनी फाऊंडेशनच्या वतीने भावाचे प्रेम न लाभलेल्या बहिणींसाठी ‘माहेर’ हा खास उपक्रम शुक्रवारी, 9 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला. 

       यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक पोलीस उपनिरीक्षक बालाजी किरवले, सामजिक कार्यकर्ते शेख इब्राहिम, दैनिक महाभूमिचे जालना जिल्हा प्रतिनिधी विनोद काळे यांनी बहिणींकडून राखी बांधून घेत त्यांना ‘माहेरची साडी’ भेट दिली. या रक्षाबंधनामुळे उपस्थित बहिणींच्या चेहर्‍यावर हास्य फुलले. 

    दरम्यान, रक्षाबंधन सणानिमित्त बहीण आपल्या लाडक्या बंधुरायाला राखी बांधून हे बहीण भावाच्या पवित्र नात्याला अधिक बळकट करीत असते. मात्र, अनेक बहिणींना बंधुप्रेम लाभलेले नसते. अशा भाऊ नसलेल्या बहिणींना रक्षाबंधन सण आला की, आपल्याला पण भाऊ असता तर आपणही त्याला आनंदाने राखी बांधली असती, असा विचार त्यांच्या मनात येतोच. ही बाब लक्षात घेऊन अंजनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा ज्योती आडेकर, सचिव विद्या जाधव आणि संस्थापक बालाजी किरवले, शेख इब्राहिम यांच्या संकल्पनेतून ‘माहेर’ हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. बंधुप्रेमाला पारखे झालेल्या अनेक बहिणींना माहेर हा उपक्रम ते बंधुप्रेम मिळवून देतो. दरम्यान शनिवारी हा उपक्रम जालना शहरातील अंजनी फाउंडेशनच्या कार्यालयात राबविण्यात आला. यावेळी अनेक बहिणींकडून राखी बांधून घेऊन त्यांच्या चेहर्‍यावर आनंद फुलविण्यात आला. 

  भाऊ नसलेल्या बहिणीने भाऊ रायला राखी बांधून औक्षवंत केले. राखी बांधताना बहिणीचे डोळे पानावले.

यावेळी जवळपास 100 महिलांना साड्या वाटप करण्यात आल्याची माहिती विद्या जाधव यांनी दिली.

विविध सामाजिक उपक्रम 

जालना येथील अंजनी फाऊंडेशनच्या वतीने वयोवृद्ध नागरिकांना दत्तक घेणे, रस्त्यावरील मनोरुग्ण, अपंग, निराधार नागरिकांना गरजू , जीवनावश्यक वस्तू पुरविणे, दिवाळी उपक्रम, हिवाळी उपक्रम, पावसाळी उपक्रम, उन्हाळी उपक्रम तसेच शिक्षण, आरोग्य, रोजगार व व्यसनमुक्ती या क्षेत्रात सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »