Maharashtra Lok Sabha Election Result 2024: राज योग.. राज योग.. कशाला म्हणतात, याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीच्या निकाला दरम्यान पुढे येत आहे. सर्व दृष्टीने विरोधात वातावरण असतानाही पुन्हा एकदा बुलढाणा लोकसभा मतदारसंघात ‘ प्रताप राज’ येण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.
बुलढाणा: राज योग.. राज योग.. कशाला म्हणतात, याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीच्या निकाला दरम्यान पुढे येत आहे. सर्व दृष्टीने विरोधात वातावरण असतानाही पुन्हा एकदा बुलढाणा लोकसभा मतदारसंघात ‘ प्रताप राज‘ येण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.
सलग चौथ्यांदा प्रतापराव हजारो मतांचा लीड घेऊन निर्विवाद विजयाकडे वाटचाल करीत असल्याचे दिसून येत आहे. दुपारी एक वाजेनंतर विजयाचे चित्र स्पष्ट होईल. कधी नव्हे मा 18 व्या लोकसभा निवडणुकीत प्रतापराव जाधव यांना ग्राउंड लेव्हल वर विरोध असल्याचे दिसून येत होते. मात्र त्यांच्या प्रचार यंत्रणेचे नियोजन, अचूक मांडणी, सभांमधून त्यांनी मतदारांसमोर ठेवलेले विषय सर्वच बाबी त्यांच्या विजयासाठी पूरक ठरत असल्याचे दिसते. काही तासातच चित्र स्पष्ट होणार आहे..