Maharashtra Lok Sabha Election 2024 Result विदर्भ : विदर्भात कोणाच्या बाजूने कौल? नागपुरात नितीन गडकरींची आघाडी; चंद्रपुरमध्ये सुधीर मुनगंटीवारांची पिछाडी

नितीन गडकरी

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result विदर्भ : देशभरात लोकसभा निवडणूक २०२४ ची मतमोजणी सुरु झाली आहे. तर लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीची सुरुवात ज्या विदर्भापासून सुरवात झाली त्या विदर्भातील सुरुवातीचे कल हाती आले आहे.

नितीन गडकरी
नितीन गडकरी

नागपूर : देशभरात लोकसभा निवडणूक २०२४ ची मतमोजणी सुरु झाली आहे. सकाळी आठ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. येत्या काही तासात देशात कुणाची सत्ता येणार? याचे चित्र स्पष्ट होणार आहे. देशभरासह महाराष्ट्रातील मतदानाचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. तर लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीची सुरुवात ज्या विदर्भापासून सुरवात झाली त्या विदर्भातील सुरुवातीचे कल हाती आले आहे.विदर्भातील सर्वात प्रतिष्ठेची निवडणूक समजल्या जाणाऱ्या नागपूर मतदारसंघात भाजपचे नेते आणि विद्यामन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्यात थेट लढत होत आहे.

मात्र, नागपूर लोकसभा मतदारसंघातील पहिल्या फेरी पासून नितीन गडकरींची सरसी कायम असल्याच्या चित्र आहे. पहिल्या फेरीची अधीकृत घोषणा करण्यात आली असून यात नितीन गडकरी ११ हजार ६७५ मतांनी आघाडीवर आहे. तर दुसरीकडे चंद्रपूर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी आघाडी घेतली असून भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची पिछाडी असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

विदर्भात कोणाची आघाडी?

पहिल्या फेरीत समोर आलेल्या आकडेवारी नुसार महायुतीत भाजप 4 ठिकाणी आघाडीवर आहे. शिंदेंची शिवसेना 2 उमेदवार आघाडीवर आहे. तर महाविकस आघाडीत ठाकरे गटाचे खाते खुले झाले असून 1 जागी सरसी आहे तर काँग्रेसने 3 जागी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या फेरी नंतर रामटेक मतदारसंघात काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे 7440 मतांनी आघाडीवर आहेत तर शिवसेनेचे राजू पारवे पिछाडीवर आहेत. नागपुरात नितीन गडकरी 11 हजार 675 मतांनी आघाडीवर आहे. चंद्रपूर मतदारसंघात दुसरी फेरीत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर 19 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर सुधीर मुनगंटीवार हे पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे.तर विदर्भातील हॉट सीट असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार नवनीत राणा या पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे.तर मविआचे उमेदवार बळवंत वानखडे 3539 मतांनी आघाडीवर आहे. अकोल्यात पाचव्या फेरी अखेर काँग्रेसचे डॉ.अभय पाटील 2983 मतांनी आघाडीवर आहेत तर भाजपचे अनुप धोत्रे दुसर्या क्रमांकावर आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

मतदारसंघ – अकोला

उमेदवार – अभय पाटील : 65452
उमेदवार – अनुप धोत्रे : 42469
उमेदवार : प्रकाश आंबेडकर : 46186
फेरी –पाचवी
मतांची आघाडी – 2983 : अभय पाटील : काँग्रेस

मतदारसंघ– यवतमाळ-वाशिम

उमेदवार – संजय देशमुख- 88565
उमेदवार – राजश्री पाटील-66540
फेरी – 4 फेरी
मतांची आघाडी – संजय देशमुख – 22025

मतदारसंघ – अमरावती

फेरी – दुसऱ्या फेरी अखेर

नवनीत राणा – 7115
बळवंत वानखडे – 15098

मतांची आघाडी – बळवंत वानखडे 7983 मतांनी आघाडीवर

मतदारसंघ – भंडारा – गोंदिया

उमेदवार (महायुती) सुनील मेंढे : 30488
उमेदवार (महाविकास आघाडी) – डॉ प्रशांत पडोळे : 29210
फेरी : पाचवी
मतांची आघाडी –
नाव :सुनील मेंढे
आकडा : 1278

वर्धा – ईव्हीएम मतमोजणी

फेरी – तिसरी

रामदास तडस( भाजप) – 46506
अमर काळे (राष्ट्रवादी कॉग्रेस) – 53235

आघाडीवर – 6729 मतांनी अमर काळे आघाडीवर

बुलढाणा मतदारसंघ- चौथी फेरी अखेर

फेरी – चौथी फेरी अखेर

प्रतापराव जाधव – १५१९९

नरेंद्र खेडेकर – ११६८७

रविकांत तुपकर – १०१५९

प्रतापराव जाधव ३५१२ मतांनी आघाडीवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »