Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Buldhana: सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतांची मोजणी केली जात आहे. पुढच्या काही तासांत कोणत्या जागेवरून कोणाचा विजय झाला, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून बुलढाणा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष होते. या जागेवरही आता मतमोजणी चालू बुलढाणा येथे प्रतापराव जाधव हे 6 हजार 814 मतांनी पुढे आहेत.
ब्रम्हानंद जाधव/ बुलढाणा : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतांची मोजणी केली जात आहे. पुढच्या काही तासांत कोणत्या जागेवरून कोणाचा विजय झाला, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून बुलढाणा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष होते. या जागेवरही आता मतमोजणी चालू बुलढाणा येथे प्रतापराव जाधव हे 6 हजार 814 मतांनी पुढे आहेत. बुलढाणा या जागेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कारण या जागेवरून शिवसेना शिंदे गटाचे हॅट्रीक करणारे खासदार प्रतापराव जाधव हे उभे राहिलेले आहेत. दुसरीकडे याच जागेवरून शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर मैदानात आहेत. तर दुसरीकडे अपक्ष रविकांत तुपकर आहे. सध्या या जागेसाठी मतमोजणी केली जात आहे. सध्या येथे प्रतापराव जाधव 6 हजार 814 मतांनी आघाडीवर आहेत. अजूनही येथे मजमोजणी चालूच आहे. त्यामुळे प्रतापराव जाधव यांची ही आघाडी कायम राहणार की शिवसेना ठाकरे गट, अपक्ष उमेदवार जाधव यांना मागे टाकणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बुलढाण्यात कोणामध्ये प्रमुख लढत
प्रतापराव जाधव – शिवसेना शिंदे गट
नरेंद्र खेडेकर – शिवसेना उबाठा
रविकांत तुपकर – अपक्ष
पाचवी फेरी
प्रतापराव जाधव – 30780
नरेंद्र खेडेकर – 23966
रविकांत तुपकर – 19739
वसंत मगर – 6707
संदिप शेळके – 1114