Lok Sabha Election: मी शरद पवार यांचा मुलगा असतो, तर मला संधी मिळालीच असती. पण केवळ त्यांचा मुलगा नाही म्हणून डावलले जात असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
पुणे : मी शरद पवार यांचा मुलगा असतो, तर मला संधी मिळालीच असती. पण केवळ त्यांचा मुलगा नाही म्हणून डावलले जात असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. या माध्यमातून अजित पवार यांनी त्यांच्या मनातील खदखद बाहेर काढली.
पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील सभेला संबोधित करताना अजित पवार बोलत होते. भारतीय जनता पक्षासोबत चर्चा झाली, पण सोबत जाण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, या शरद पवारांच्या वक्तव्यावर ते म्हणाले की, चर्चा झाली हे मान्य आहे. या संवादाचे आपण साक्षीदार असल्याचेही अजित पवार म्हणाले. गेल्या वर्षी जुलैमध्ये अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ आमदार महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले. या घटनेनंतर शरद पवार (८३) यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादीत फूट पडली. अजित पवार म्हणाले, माझं वयही ६० च्या वर आहे. आम्हाला काही संधी आहे की नाही? आपण चुकीचे वागतोय का? त्यामुळे आपण भावूक होतो. पवार साहेब हे सुद्धा आपले ‘देव’ आहेत यात शंका नाही पण प्रत्येक माणसाचा वेळ असतो. वयाची 80 ओलांडल्यानंतर नवीन लोकांना संधी दिली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.