Lok Sabha Election:काँग्रेसला विजयाची आशा;’वंचित’च्या खेळीचा भाजप साधणार का मोका?

Lok Sabha Election

Lok Sabha Election: सत्ताधारी भाजपाने नवखा उमेदवार मैदानात उतरवल्याने तब्बल ३५ वर्षांनी काँग्रेस विजयाची आस लावून आहे. मात्र,’वंचित’च्या खेळीने काँग्रेसला मतविभाजनाची चिंता आहे.याच संधीचा फायदा घेत भाजप पुन्हा मोका साधणार काय,अशी चर्चा अकोला लोकसभा मतदार संघात सुरू असल्याचे दिसून येते.

Lok Sabha Election
Lok Sabha Election

प्रवीण खेते / अकोला : सत्ताधारी भाजपाने नवखा उमेदवार मैदानात उतरवल्याने तब्बल ३५ वर्षांनी काँग्रेस विजयाची आस लावून आहे. मात्र,’वंचित’च्या खेळीने काँग्रेसला मतविभाजनाची चिंता आहे.याच संधीचा फायदा घेत भाजप पुन्हा मोका साधणार काय,अशी चर्चा अकोला लोकसभा मतदार संघात सुरू असल्याचे दिसून येते.
अकोला लोकसभा मतदार संघात भाजपाचे खासदार संजय धोत्रे यांनी विजयी चौकार मारला आहे. मात्र, यंदा त्यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांचे चिरंजीव अनुप धोत्रे लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे प्रारंभी भाजपाचा विजयी रथ रोखण्यासाठी ‘वंचित’ पुर्ण तयारी केली खरी, मात्र मनोमिलन न झाल्याने काँग्रेसने अकोला लोकसभा मतदार संघात डॉ.अभय पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाचे अनुप धोत्रे विरूद्ध ‘वंचित’चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे डॉ. अभय पाटील, अशी तिरंगी लढत स्पष्ट झाली. नवख्या चेहऱ्यामुळे मतदारसंघात भाजपा दुबळी ठरेल म्हणून तब्बल ३५ वर्षांनी काँग्रेसला विजयाची आस लागली आहे. मात्र,भाजपा विरूद्ध काँग्रेस आणि ‘वंचित’ असल्याने काँग्रेस आणि ‘वंचित’ला मतविभाजनाची चिंता सतावत आहे.परिमामी लोकसभेच्या रिंगणात ‘वंचित’ची उपस्थिती काँग्रेससाठी जड ठरू शकते. काँग्रेस आणि ‘वंचित’ या दोन्ही पक्षांच्या मतविभाजनाचा फायदा घेत भाजपा पुन्हा मोका साधत सत्ता काबिज करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

२० वर्षांपूर्वी भाजपाने साधली संधी

अकोला लोकसभा मतदार संघात सलग ३७ वर्ष एकहाती सत्ता मिळवणाऱ्या काँग्रेसचा विजय रथ भाजपाच्या पांडुरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर यांनी १९८९ मध्ये रोखला. मात्र, भाजपाची जादू फार काळ टिकली नाही. १९९८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या रुपाने भारिपला संधी मिळाली. त्यानंतर २००४ मध्ये भाजपाचे संजय धोत्रे यांच्या विजयासोबतच अकोला लोकसभा मतदार संघ भाजपाचा बालेकिल्ला ठरला. तब्बल २० वर्षांच्या एकहाती सत्तेनंतर अकोला लोकसभा निवडणुकीत पुन्हा परिवर्तनाची चर्चा होत आहे.

तिन्ही पक्षांनी सत्ता भोगली, मात्र विकास गवसलाच नाही

अकोला लोकसभा मतदार संघात सर्वाधिक काळ काँग्रेसकडे एकहाती सत्ता होती. त्यानंतर भाजपा आणि प्रकाश आंबेडकर यांच्या रुपात भारीपने सत्ता भोगली. प्रत्येक निवडणुकीत आश्वासनं, नव्या धोरणांतून मतदारांना विकासाची स्वप्न दाखवली गेली, मात्र अद्यापही अकोल्यातील मतदारांना विकास गवसलाच नाही.

असा राहिला तिन्ही पक्षांचा सत्ता काळ

नाव                                  –  पक्ष           – कार्यकाळ
गोपाळराव खेडकर          –  काँग्रेस        –    १९५२-५७
लक्ष्मण भाटकर                –  काँग्रेस        –   १९५७-६०
टी. एस.पाटील                  –  काँग्रेस       –    १९६०-६२
मोहम्मद मो. हक              –  काँग्रेस       –    १९६२-६७
के.एम असगर हुसेन          –  काँग्रेस      –    १९६७-७१
के.एम असगर हुसेन          –  काँग्रेस      –     १९७२-७७
वसंत साठे                         –  काँग्रेस      –     १९७७-८०
मधुसूदन वैराळे                 –  काँग्रेस      –      १९८०-८४
मधुसूदन वैराळे                 –  काँग्रेस       –     १९८४-८९
पांडुरंग फुंडकर                –  भाजप        –     १९८९-९१
पांडुरंग फुंडकर                –  भाजप       –       १९९१-९६
प्रकाश आंबेडकर              –  भारिप       –      १९९८-९९
प्रकाश आंबेडकर             –    भारिप     –      १९९९-२००४
संजय धोत्रे                        –    भाजप      –       २००४ ते आजपर्यंत
————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »