स्वामी विवेकानंद यात्रा महोत्सवाची सांगता; अभूतपूर्व शिस्त;लाखो भाविकांना एकाचवेळी महाप्रसाद वितरण भगवान राईतकर

हिवराआश्रम : अध्यात्मासह विज्ञानाची सांगड घालत, आपल्या कृतीशील सकारात्मक उपक्रमातून महाराष्ट्रच नव्हेतर देशभरात  आपली आगळीवेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मेहकर तालुक्यातील हिवराआश्रम येथील विवेकानंद जन्मोत्सवाची दरवर्षी लाखो भाविकांना प्रतीक्षा असते. यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमाने  यात्रा महोत्सवाला रंगत आली दरम्यान शनिवार १० जानेवारी  रोजी  पौष वद्य सप्तमीला लाखो भाविकांना एकाचवेळी पुरी भाजीच्या महाप्रसादाचे वितरण करून या महोत्सवाची सांगता करण्यात आली. अभूतपूर्व शिस्तीचे दर्शन यामधून दिसले.

  स्वामी विवेकानंद की जय… भारतमाता की जय…प.पू शुकदास महाराज की जय…. अशा जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता.  तब्बल ६२  वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्याने वातावरण भक्तीमय झाले होते. सायंकाळी 4 वाजता जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील, माजी आमदार संजय रायमूलकर, विठ्‍ठल रूखमिनी मंदिर पंढरपूरचे विश्वस्त हभप प्रकाश महाराज जवंजाळ, आसोबा आसाराम भारती यांच्या उपस्थितीत विद्यार्थी- विद्यार्थिनींनी भाविकांचे पूजन करून त्यांना कुंकूम-चंदन तिलक लावला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  भाविकांना  महाप्रसाद वितरणास सुरुवात करण्यात आली. विवेकानंद कृषि महाविद्यालय , विवेकानंद एबीएम कॉलेज, विवेकानंद नर्सिंग महाविद्यालय, विवेकानंद विज्ञान महाविद्यालय, विवेकानंद जीएनएम महाविद्यालयाच्या, विवेकानंद विद्या मंदिर, विवेकानंद ज्ञानपीठाच्या विद्यार्थी व विद्यार्थीनीं व स्वयंसेवकांनी महाप्रसाद वितरणात सहभाग घेतला होता. यावेळी युवासेनेचे जिल्हाध्यक्ष ॠषी जाधव,नगराध्यक्ष किशोर गारोळे,काँग्रेस प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर,भाजपा नेते सुरेशआप्पा खबुतरे,उद्योजक एकनाथ दुधे, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख भाष्करराव मोरे, दत्‍ताभाऊ खरात, गिरधर ठाकरे, माजी जि.प.सदस्य संजय वडतकर, शिवसेना तालुकाप्रमुख निंबा पांडव, पत्रकार सिध्देश्वर पवार, कैलास सुखदाने, प्रा.प्रशांत पडघान, जिजाऊ अर्बन पतसंस्थेचे नंदाराम काळे, प्रकाश डोंगरे, तहसिलदार निलेश मडके, प्रमोद रायमूलकर, संतोष थोरहाते, सदाशिव काळे,मधु आढाव, भगवान राईतकर, शिवप्रसाद थुट्टे,भरत सारडा आदींची उपस्थिती होती. उपस्थित होते. यावेळी साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी यात्रेमध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवला. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन हभप गजाननदादा शास्त्री महाराज यांनी केले.

53 पंगती,3000 स्वयंसेवक अन 101 ट्रॅक्टर

सामूहिक शिस्तीची भक्ती दाखवीत ४० एकरांच्या परिसरात एकाचवेळी ५३ पंगती बसल्या होत्या. तब्बल १०१ ट्रॅक्टरद्वारे व 3 हजार स्वयंसेवकांनी महाप्रसाद वितरणात सहभाग घेतला होता. विशेष बाब म्हणजे, कोणतीही अस्वच्छता न करता ही महापंगत उठली. यावेळी जिल्ह्यातीलच नव्हे राज्यभरातून भाविक महाप्रसादासाठी उपस्थित होते. सर्व स्वयंसेवक  ड्रेस कोडमध्ये दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »