Lok Sabha Election 2024: भाजपाने आपला पराभव मान्य केला – खा. संजय राऊत

खा. संजय राऊत

Lok Sabha Election 2024: देवेंद्र फडणवीस सांगतात 45, पण आम्ही महाविकास आघाडीचा आकडा 35 प्लस सांगतो. 20 जागाच फिक्स केल्या म्हणजे भाजपने आपला पराभव मान्य केला असल्याचे म्हणत खा. राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढविला.

खा. संजय राऊत
खा. संजय राऊत

छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या हस्ते आज 13 एप्रिल रोजी महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन पार पडले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस सांगतात 45, पण आम्ही महाविकास आघाडीचा आकडा 35 प्लस सांगतो. 20 जागाच फिक्स केल्या म्हणजे भाजपने आपला पराभव मान्य केला असल्याचे म्हणत खा. राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढविला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याचदरम्यान आज छत्रपती संभाजीनगर शहरातील समर्थनगर भागातील सावरकर चौकात खैरे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शरद पवार गटासह काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते देखील उपस्थित होते.
यावेळी बोलतांना खासदार संजय राऊत म्हणाले की, मराठवाड्यात ठाकरे गटाचे चारही उमेदवार मोठ्या ताकतीने विजयी होतील. जालना आणि लातूरमध्ये बदल होईल हे खात्रीने सांगतो. नांदेडमध्ये आदर्श टॉवर कोसळून जाईल आणि पंकजा मुंडे यांना देखील निवडणूक सोपी नाही असेही भाकित यावेळी खासदार संजय राऊत यांनी वर्तविले.

प्रकाश आंबेडकरांसाठी आमचे दरवाजे उघडेच

यावेळी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोबत राहावे म्हणून आम्ही हात जोडले, विनवण्या केल्या. संविधान रक्षणासाठी त्यांनी सोबत यावं ही सगळ्यांची भूमिका होती. आम्ही सहा जागा देऊ केल्या होत्या. पण, आजही त्याच्यासाठी आमचे दरवाजे उघडे आहेत असे सूचक विधान खासदार संजय राऊत यांनी यावेळी केले.

पंतप्रधान मोदींवरही हल्लाबोल

राज्यातील स्थानिक नेत्यांसह खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. मोदींचे नाने घासून पुसून गुगुळीत झाले आहे. मोदी मोदी आता बाजारात चालत नाही. कोण चिंकन खातात आणि कोण खात नाही हा काय प्रचाराचा मुद्दा नाही. बीफ निर्यात करणाऱ्या 5 कंपनीकडून साडेपाचशे कोटी निधी घेतला, याच उत्तर मोदी यांनी द्यावं असाही थेट सवाल त्यांनी यावेळी विचारला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »