वैजापूर : तालुक्यातील एका शेतवस्तीवरील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘रेस्क्यू ऑपेरेशन’ करुन वाचविले. बिबट्याला ‘रेस्क्यू ऑपेरेशन’ करुन वाचविण्यात आल्याची घटना शुक्रवार, 19 डिसेंबर रोजी घडली. वन विभागाच्या पथकाने बिबट्याला ताब्यात घेवून सुरक्षितपणे त्याला जंगलात सोडून दिले.

वैजापूर तालुक्यातील एका शेतवस्तीवरील विहिरीत बिबट्या पडला असल्याची माहिती शुक्रवारी वाऱ्यासारखी वैजापूर तालुक्यात पसरली. विहिरीत पडलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थ जमा झाले होते. या घटनेची माहिती मिळाल्यावर वन परीक्षेत्र अधिकारी पी. बी. भिसे, वनपाल ए के पाटील, वनरक्षक ए एम सय्यद, सुरज शेळके यांच्यासह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विहिरीत बाज सोडली. बऱ्याच प्रयत्नानंतर बिबट्या बाजेवर आल्यानंतर त्याला पिंजऱ्यात पकडून विहिरीबाहेर काढण्यात आले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल अडीच ते तीन तास प्रयत्नांची पराकष्टा करीत बिबट्याला जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.